महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमात जामनेर तहसील कार्यालय नाशिक विभागात अव्वल


जामनेर-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागात जामनेर तहसील कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तहसीलदार नानासाहेब आगळे यांचा तहसील कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या १०० दिवस कार्यक्रमात जामनेर तहसील कार्यालयाने प्रभावीपणे विविध उपक्रम राबविले. यामध्ये वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीला चालना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांसारख्या कामांचा समावेश होता. तसेच, महसूल विभागाच्या कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची कामे त्वरित व्हावी यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते.

या सर्वोत्कृष्ट कार्यामुळेच जामनेर तहसील कार्यालयाने नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचे विजेतेपद मिळवले आहे. या यशाबद्दल तहसील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या नेतृत्वाखालील टीमचे कौतुक केले.