जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सत्र व कौटुंबिक न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या सौ. सीमा एन. पाटील (जाधव) यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब वकील क्षेत्रात कार्यरत आहे, ही विशेष बाब आहे.
सीमा पाटील या केवळ यशस्वी वकीलच नाहीत, तर त्या नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, रेड स्वास्तिक आणि निसर्ग व पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांची सामाजिक बांधिलकी आणि कायद्याच्या क्षेत्रातील निष्ठा यामुळे त्यांची नोटरी पब्लिकपदी निवड झाली आहे. सीमा पाटील यांच्या या नियुक्तीमुळे जळगावच्या वकील वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.