Home क्राईम अज्ञात भरधाव वाहनाने परप्रांतीयाला उडविले

अज्ञात भरधाव वाहनाने परप्रांतीयाला उडविले

0
116


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर पासून जवळ असलेल्या कुसुंबा शिवार परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सोनू बारेला (वय अंदाजे ४५ वर्ष, मूळ रा. शिरवेल महादेव, जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. कुसुंबा शिवार) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात १५ मे रोजी गो शाळेसमोर घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले सोनू बारेला हे कुसुंबा शिवारातील एका शेतात वास्तव्यास होते. १५ मे रोजी ते पायी जात असताना भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेनंतर मृताचे पुत्र नीलेश सोनू बारेला यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या फिर्यादीच्या आधारे अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.


Protected Content

Play sound