जामनेर पोलिसांनी राबविली स्वाक्षरी मोहीम (व्हिडिओ)

नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ     

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलीस बदल्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून जामनेर पोलीस स्टेशन तर्फे सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नपा गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अरुण राठोड, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक अतिश झाल्टे, भाजपाचे ज्येष्ठ नेते छगन झाल्टे, निलेश चव्हाण, सुभाष पवार, भारत रीच्वल, कैलास पालवे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, तुषार पाटील, योगेश महाजन यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी नागरिकांनी सामाजिक एके जोपासण्यासाठी सर्व शहरवासीयांनी गुण्यागोविंदाने रहावे, त्याचबरोबर पोलिसांना सहकार्य करावे. कोणतेही शांतता भंग होणार नाही, याकडे लक्ष देऊन सोशल मीडिया वापरताना सावधानी बाळगावी त्यामुळे गावात शांतता या राहील, असे आवाहन यावेळी शिदे यांनी बोलताना केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!