यांना भूमिका बदलवणे सोपे आहे -ना. गुलाबराव पाटील

राज ठाकरेंवर ना. गुलाबराव पाटील यांनी साधला निशाणा

जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – अगोदर अन्य राज्याच्या विरोधात भूमिका, आता त्याच राज्यांचे गुणगान, आतापर्यत वेळ पाहून खेळ करत सतत भूमिका बदलवणे सोपे आहे. अशी टीका जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवर केली.

राज ठाकरे यांनी सगळ्यांना सोबत घेणार असे म्हणत पक्ष स्थापन केला. परंतु पक्षाची स्थापना करण्यापूर्वी मराठी, मराठी म्हणून उत्तर प्रदेशाच्या कानफटीत मारत झेंडा लावला. नंतर भूमिका बदलली झेंडा पण बदलला, लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदींना विरोध केला. पुन्हा मोदींची प्रशंसा करत भोंगा लावत उत्तर प्रदेशचे कौतुक केले.

आणि आता निघाले अयोध्यानाथाला भेटायला. आतापर्यत यांनी  तीन भूमिका बदलल्या सतत भूमिका बदलवणे यांच्यासाठी ही सोपे आहे, असा टोला ना.गुलाबराव पाटलांनी राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेवर शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना लगावला. ते जळगाव शहरात जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व समाजात एकता व सलोख्याचे वातावरण निर्मितीसाठी जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. या उपक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!