खासगी रूग्णालयातील वादावरून जामनेरात लाठीमार

जामनेर प्रतिनिधी । शहरातील एका खासगी रूग्णालयात रूग्ण तरूणी व कंपाऊंडरमध्ये झालेल्या वादानंतर एका जमावाने रूग्णालयात गोंधळ झाल्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागल्याची घटना घडली.

याबाबत वृत्त असे की, शहरातील आशीर्वाद हॉस्पीटलच्या आयसीयूमध्ये एका अठरा वर्षाच्या तरूणीवर उपचार सुरू होते. मेंदूज्वराने आजारी असणारी ती तरूणी ओरडत असल्याने इतर रूग्णांनी याची तक्रार डॉक्टरांकडे केली. यामुळे त्या तरुणीला दुसर्‍या आयसीयूत हलवले. दरम्यान, याच तरूणीला कंपाउंडर ज्ञानेश्‍वर पाटील हा सलाईन लावत असतांना तिने ओरडून तरुणीने कंपाउंडरच्या हाताचा चावा घेतला. यावेळी कंपाउंडरने आपल्याला मारहाण केल्याचे तिने नातेवाइकांना सांगितले.

हा प्रकार माहिती होताच मोठ्या संख्येने जमाव रुग्णालयासमोर जमला. त्याली काही जणांनी रूग्णालयाच्या परिसरात गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमर सुरू केल्याने जमाव नियंत्रणात आला.

याप्रकरणी तरुणीने जामनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंपाउंडर ज्ञानेश्‍वर पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे हे करत आहेत.

Protected Content