बोरंन्हाणमधून केले जातेय चिमुकल्यांचे कौतुक !

खामगाव अमोल सराफ । काळाच्या ओघातही अनेक प्रथा-परंपरा टिकून राहिल्या असून यात बोरंन्हाणचा समावेश आहे. या माध्यमातून संक्रांतीनंतर चिमुकल्यांचे कौतुक केले जात असल्याचे आपल्याला आजही दिसून येते.

याबाबत वृत्त असे की, बोरन्हाण (लूट)हे लहान मुलांच्या विशेषतः १ ते ५ वर्ष वयोगटातल्या चिमुकल्यांचे उत्तम आरोग्यासाठी करण्यात येणारी पारंपारिक पद्धत आहे. मूल जन्माला आल्यानंतर येणार्‍या पहिल्या संक्रांतील लहान मुलांना हे बोरन्हाण घातलं जाते. शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घालतात. या कार्यक्रमामध्ये लहान चिमुकल्यांना औक्षण करून त्यांना त्यांचे आवडतं चॉकलेट, बिस्कीट, मुरमुरे याचे एक प्रकारे त्यांच्यावर लूट केल्या जाते व हे एकत्रित करण्याकरिता त्यांच्याच वयोगटातील सवंगडी मित्रांची एकच दमछाक होते.

अशाप्रकारे १ते ५ वर्ष वयोगटातील चिमुकलं करता एक आनंदाचा क्षण म्हटल्यास वावगे ठरणार नाही त्यामुळे लहान वयाचे महत्त्व चे आठवनीच पुन्हा एकदा या पद्धतीतून उजाळा मिळतो. बालपण देगा देवा असे संतवचन हे किती खरे आहे याची प्रचिती आपल्याला या कार्यक्रमातून मिळते. यामुळे बोरन्हाणं करतांना चिमुकले त्यात हरवून जातात तर मोठ्या मंडळींनाही आपल्या रम्य बालपणाची नक्कीच आठवण येते.

Protected Content