धावत्या रेल्वेतून पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गवळीवाडा परिसरात राहणारा राहुल रामदास गवळी (वय-२८) या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नांदगाव ते मनमाड दरम्यान घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यात राहुल गवळी हा तरुण वास्तव्यास होता. हातमजूरी करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. शुक्रवारी २४ नोव्हेंबर राहुल हा रेल्वेतून प्रवास करीत असतांना त्याचा तोल जावून तो रेल्वेतून खाली पडला.  यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्टेशनप्रबंधक यांनी रेल्वे पोलिसांन दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाची ओळख पटवून मृतदेह जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला आहे.

Protected Content