महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेच्या १४ विशेष गाड्या

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसंस्था । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने १४ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्यामध्ये नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ३, सीएसएमटी/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर ६, कलबुर्गी ते सीएसएमटी २, सोलापूर ते सीएसएमटी २ आणि अजनी ते सीएसएमटी १ विशेष गाडी असणार आहे. दरम्यान, ट्रेन क्र. ११४०१ सीएसएमटी-आदिलाबाद एक्स्प्रेसला एक जादा कोचही जोडण्यात आला आहे.

नागपूर विशेष एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक स्थानक तारीख आणि वेळ

०१२६२ नागपूर-सीएसएमटी ४ डिसेंबर, रात्री ११.५५

०१२६४ नागपूर-सीएसएमटी ५ डिसेंबर, सकाळी ८

०१२६६ नागपूर-सीएसएमटी ५ डिसेंबर, दुपारी ३.५०

थांबे : नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, ईगतपुरी, कसारा, कल्याण, दादर

६ अनारक्षित विशेष रेल्वे

०१२४९ सीएसएमटी-अजनी ६ डिसेंबर, दुपारी ४.४५

०१२५१ सीएसएमटी-सेवाग्राम ६ डिसेंबर, सायंकाळी ६.३५

०१२५३ सीएसएमटी-अजनी ६ डिसेंबर, रात्री १२.४०

०१२५५ सीएसएमटी-नागपूर ७ डिसेंबर, रात्री १२.३५

०१२५७ सीएसएमटी-नागपूर ८ डिसेंबर, सायंकाळी ६.३५

०१२५९ दादर-अजनी ७ डिसेंबर, रात्री १२.४०

थांबे : दादर, कल्याण, कसारा, ईगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर

Protected Content