मोठी बातमी : गांजाची शेती करणाऱ्या दोघांना अटक; ३१ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील उत्तम नगर परिसरात शेतात गांजाची लागवड केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पोलिसांनी जवळपास ३१ लाख ८० हजारांचा मुद्देमाल मिळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून तिसरा फरार झाला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील उत्तम नगरात गावच्या शिवारात संशयित आरोपी रवी किलाऱ्या पावरा, रोहिदास देवसिंग पावरा आणि राहुल खिलारे पावरा तिघे रा. उत्तम नगर तालुका चोपडा यांनी शेतात विनापरवाना दोन ते सहा फुटापर्यंत गांजाची लागवड केली होती. दरम्यान ही बाब पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकला. या ठिकाणी जवळपास ७९५ किलो वजनाचा गांजा मिळून आला आहे. याची किंमत अंदाजे ३१ लाख ८० हजार रुपये आहे. दरम्यान पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी रोहिदास देवसिंग पावरा आणि राहुल किलाऱ्या पावरा या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान सहाय्यक फौजदार देविदास ईशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास प्रभारी अधिकारी कावेरी कमलाकर करीत आहे.

Protected Content