भाजपासोबत असूनही निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले कसे होऊ – उद्धव ठाकरे

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिकच्या राज्यव्यापी महाधिवेशनात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदुत्व सोडत ठाकरे गट काँग्रेससोबत गेल्याची टीका महायुतीकडून करण्यात येते. याला आजच्या या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. आमच्यावर आरोप होतो आम्ही काँग्रेससोबत गेलो. काँग्रेसमय झालो. आम्ही ३० वर्ष भाजपसोबत जाऊन निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले कसे होऊ?, असा प्रति सवाल उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना केलाय.

तोतल्यासारखं यांना जनतेच्या न्यायलयात करायचं आहे. सत्ता पाहिजे म्हणून अधिवेशन नाही. राज्याला आणि देशाला टिकवायचं आहे. महाराष्ट्रावर चालून आले त्यांना गाडण्याचा इतिहास लिहायचं आहे. भाजपवाले होते कुठे? हे सर्व माझे शिवसैनिक. तुम्ही त्यांच्यावर खोटे आरोप करत आहेत. राजन साळवी असो की आमचे शिलेदार झुकणार नाही. आमचे लोक तुम्हाला भ्रष्टाचारी वाटत आहेत. तुमचे भ्रष्टाचाराचे पाढे वाचत आहोत, त्याच्या चौकश्या लावा ना. आम्ही लावणार आणि तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई महापालिकेचा घोटाळा काढताय. पालिकेत कोरोना काळात घोटाळा झाला. काढा. ठाणे पालिकेचा काढा. पुणे काढा, नागपूर नाशिक पालिकेचाही काढा. एवढंच काय पीएम केअर फंडाचाही घोटाळा काढा. काय पीएम केअर म्हणजे काय प्रभाकर केअर फंड नव्हता तो. अरे वसाड्या फंड दे. म्हणे पीएम केअर फंड खासगी आहे. उद्या पंतप्रधान नसणार. तेव्हा तो फंड कुठे नेणार. लाखो करोड जमा केले. ते कुठे घेऊन जाणार. यांचा भ्रष्टाचार चालल्यावर एखाद दिवस बातमी चालते. वरून फोन आला की बंद होते. यांचे जे घोटाळे आहेत. नालायकांनो, रुग्णवाहिकांनो त्यातही घोटाळा केला, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर शाब्दिक वार केला आहे.

किशोरी ताईंवर बॉडीबॅगचा घोटाळ्याचा आरोप करता. कॅगचा अहवाल आहे, त्यात भाजपच्या राज्यात मृतदेहांवर उपचार केल्याचं दाखवून पैसे काढत आहे. त्या घोटाळ्यावर बोलत नाही. पण इकडे शिवसैनिकांना बदनाम करता. घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडापासून झाली. स्वच्छ असाल तर हिशोब द्याल. स्वच्छच नाही तर हिशोब कसला द्याल. हे ईडीबिडी त्यांच्या घरगड्यांसारखे राहतात. काही घरगडी आम्हाला द्या. आम्हीही धाडी टाकतो, अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Protected Content