गुरे तस्करीचा डाव उधळला : दोन आरोपींसह वाहने पोलिसांच्या ताब्यात

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दोन टाटा मॅजिक वाहनांमधून कत्तलीसाठी गुरांना घेऊन जाणार्‍या दोघांना दोन वाहनांसह अटक करण्यात आली आहे.

दोन टाटा मॅजिक गाड्यांमध्ये कत्तलीच्या उद्देशाने निर्दयी पणे गोवंश कोंबून नेताना फैजपूर पोलिसांनी पकडुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दुपारी आवेश अस्लम कुरेशी ( रा. गढी मोहल्ला रसलपुर ) आणि सय्यद उमद सय्यद इकबाल यांच्या ताब्यातील टाटा मॅजिक छोटा हाथी क्रमांक एम एच २१ एक्स १६१५ तसेच एम एच ०४ डीएस २८७३ या दोन गाड्यांमध्ये निर्दयीपणे बैल नेत असताना आढळून आले.

या कारवाईत बैलांसह २,१८,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून संबंधितांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० सेक्शन ११ (१) क,घ, ड, च, ज अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये ११९ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ कलम ९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरप ोलिसांनी संशयित आरोपी आवेश कुरेशी व सय्यद इकबाल यांना अटक केली असून पुढील तपास एपीआय निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल मोहे तपास करीत आहेत.

Protected Content