यशस्वी खेळाडूंचे जामनेरात जंगी स्वागत

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील इंदिराबाई ललवाणी शाळेतील खेळाडू हे डॉगबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवून विजयी झाले असून त्यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले.

शहरातील इंदिराबाई ललवाणी शाळेतील खेळाडूंनी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय डॉगबॉल मध्ये प्रथम पारितोषिक मिळवून विजयी झाले आहेत तर मुख्यमंत्री चषक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ही खेळाडू विजयी होऊन या खेळाडूंना मुख्यमंत्री चषक प्रथम पारितोषिक देण्यात आले मिळाले.

या स्पर्धेमध्ये दोन गटाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता या इंदिराबाई ललवाणी शाळेतील खेळाडूंचे जामनेर शहरांमध्ये फटाके फोडून व ढोल ताशाच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली व नगरपालिका चौकामध्ये नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते या सर्व विजयी खेळाडूंचे नागरी सत्कार करण्यात आला.

Protected Content