शहर वाहतूक शाखेची रिक्षा चालकांवर धडक कारवाई

जळगाव प्रतिनिधी । आसन क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांवर आज सकाळपासून धडक कारवाई करण्यात येत असून ५० पेक्षा जास्त रिक्षा जमा करण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वीच एका तरूणीचा रिक्षातून बाहेर पडल्यावर कंटेनरने चिरडल्यामुळे मृत्यू झाला होता. यामुळे रिक्षातून होणारी धोकेदायक वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळपासून शहर वाहतूक शाखेने जास्त प्रवाशांची वाहतूक करणार्‍या रिक्षांवर धडक कारवाई सुरू केली आहे. यात शहरातून जवळपास ५० पेक्षा जास्त रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. या रिक्षांना जमा करण्यात आले असून त्यांच्या चालकांना दंड ठोठावण्यात येणार आहे. दरम्यान, एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Add Comment

Protected Content