नरेंद्र मोदी म्हणजे राष्ट्रीय आपत्ती- पवार

sharad pawar

sharad pawar

अमरावती प्रतिनिधी । नरेंद्र मोदी म्हणजे केवळ संकट नसून राष्ट्रीय आपत्ती असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, संसदीय लोकशाहीतील संस्था उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले. आम्ही सर्व विरोधकांनी सशक्त असा पर्याय उभा केला आहे, आम्हाला ते मिलावट संबोधतात. आम्ही २६ राष्ट्रीय पक्ष एकत्र आलो आहोत, पण एनडीएत ३६ पक्ष आहेत.. आम्ही २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी तयार केली, दहा वर्षे देशात चांगले सरकार दिले. सरकार चांगल्या पद्धतीने चालवण्याचा अनुभव आमच्याकडे आहे. पंतप्रधान देशात गेल्या साठ वर्षांत काय केले अशी भाषा करतात, हे कोणालाही न पटणारे आहे. नरेंद्र मोदी काल-परवा वर्धेला जाऊन आले. पण, ते सेवाग्रामला गेले नाहीत. मी गांधीवादी असल्याचे ते सांगतात, पण गांधींना विसरतात. काहीही म्हणा, नाटके करायला हा भारी माणूस आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.

यावेळी महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा, आमदार रवि राणा, माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी, अनिल देशमुख, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, वसुधा देशमुख, डॉ. देवीसिंह शेखावत, रावसाहेब शेखावत आदी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content