Home Cities जळगाव भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

0
42

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील स्वतंत्र चौकातील गांधी उद्यान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला (पुतळ्याला) भारतीय जनता पक्षातर्फे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर सीमाताई भोळे, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, सुशील हसवणी, सुभाष तात्या शौचे, कार्यालय मंत्री गणेश माळी, राजेंद्र मराठे, प्रकाश पंडित, अक्षय चौधरी, मंडल अध्यक्ष रमेश जोगी, केदार देशपांडे, नगरसेवक धीरज सोनवणे, अमित काळे, महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती ताई चिरमाडे, प्रल्हाद सोनवणे, हेमंत जोशी, कुमार सिरामे, मंगेश जुनागडे, शांताराम गावंडे, चेतन तिवारी, जयेश लोकचंदानी संजय भावसार, राहुल मिस्त्री, दिनेश पुरोहित, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound