शेतातून पन्नास हजाराच्या ठिबक नळ्यांचे १८ बंडल लंपास

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील शेतातील पन्नास हजार रुपये किमतीच्या 50.C नेटाफिम कंपनीच्या 16 mm ठिबकच्या नळ्यांची चोरट्यांनी लंपास केली आहे. यासंदर्भात खात्री झाल्याने त्यांनी कायदेशीर फिर्याद दिली असून याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “विकास गणेश पाटील हा 39 वर्षीय युवक तालुक्यातील सांगवी खुर्द येथे कुटुंबासह राहत शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. टेंभी, ता.यावल शिवारात भगवान उखर्ड पाटील, रा. टेंभी खुर्द यांचे मालकीचे शेत गट नं. 85 हे शेत ते नफ्याने करतात. सदर शेतातील 16 mm ठिबकच्या नळ्या प्रत्येकी 600 मिटर असे सुमारे 18 बंडल गोळा करुन शेतातील निंबाच्या झाडाखाली ठेवले होते.

दि. 27 मे रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंत ते शेतात पाण्याची मोटर पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा सदर शेतातील ठिबकच्या नव्या सुस्थितीत होत्या. पाण्याची मोटर पाहून ते रात्री 11.30 वाजेच्या सुमारास शेतातून निघून घरी गेले.

आज शनिवार, दि.28 मे रोजी शेतात काम करणारे जुलाल शामराव पाटील यांनी मला फोन करून सांगितले की, आपण शेतात ठेवलेले ठिबकच्या नळ्यांचे बंडल रात्रीच्या वेळेस चोरी झालेले दिसत आहे. “तुम्ही लवकर या.” असे सांगितल्याने मी लागलीच सदर शेतात जावून बघितले असता शेतातील निंबाच्या झाडाखाली ठेवलेले 16mm ठिबकच्या नळ्या सुमारे 18 बंडल प्रत्येकी 600 मिटरचे असे निंबाच्या झाडाखाली दिसले नाही.

त्यामुळे त्यांची चोरी झाली यासंदर्भात खात्री झाल्याने त्यानी अज्ञात चोरट्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे.” याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे.

Protected Content