महाडीबीटी पोर्टल वरील नोंदणीतील अडचणी दुर करा- खा. पाटील यांची मागणी

जळगाव प्रतिनिधी । शेतकर्‍यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असून या अडचणी सोडविण्याची मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी कृषी आयुक्तांकडे केली आहे.

सध्या जिल्ह्यासह राज्यात कृषी यांत्रिकिकरण उप अभियान सन २०२० / २१ अंतर्गत महाडीबीटी ऑनलाईन पोर्टल वरील नोंदणी सुरू करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत शेतकर्‍यांना लागणारे ट्रॅक्टर व ट्रॅक्टर संचलित अवजारे यांची नोंदणी गेल्या आठवडाभरापासून सुरू करण्यात आलेली असली तरी मात्र शेतकर्‍यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकर्‍यांचा प्रस्ताव सदरील महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी होण्यास दररोज सात्यत्याने अडचणी वाढत आहेत.

या ऑनलाईन उद्भवणार्‍या अडचणींबाबत कृषी विभागाने तातडीने दखल घ्यावी तसेच ऑनलाईन सोबत ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची तजवीज करण्यात यावी अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी कृषी आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. आपल्या पत्रात खासदार पाटील यांनी म्हटले आहे की, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान सन २०२० / २१ करीता शेतकर्‍यांना लागणारे ट्रॅक्टर व ट्रॅक्टर संचलित अवजारे यांची नोंदणी गेल्या आठवडाभरापासून सुरू करण्यात आलेली आहे. मात्र शेतकर्‍यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असून याकरिता शेतकर्‍यांचा प्रस्ताव सदरील महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी होण्यास सात्यत्याने अडचणी वाढत आहेत.

ज्या शेतकर्‍यांचे आधार कार्ड अपडेट नाहीत अशा देखील शेतकर्‍यांना या योजनेपासून वंचित राहता येऊ नये म्हणून आपण आपले अधीनस्थ असलेले प्रत्येक तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची तजवीज करण्यात यावी जेणेकरून शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेपासून कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही. याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आपल्या पत्रात केली आहे.

Protected Content