तरुणींना फोनवरुन त्रास देणाऱ्या तरुणाविरोधात तक्रार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील अयोध्यानगरातील तरुण व तरुणीला वेगवेगळया मोबाईल क्रमांकांवरुन फोन करुन त्रास देणाऱ्या तरुणांविरोधात सोमवार, ४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्यानगरात हाजमी अहमद मेहंदी हे वास्तव्यास आहेत. सोमवारी त्यांच्या मुलगा आणि मुलीला सत्यम साहू रा. जगवाणी नगरातील तरुणाने वेगवेगळया मोबाईल क्रमाकांवरुन फोन करुन शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला मारुन टाकेन, नाही तर माझ्या जीवाचे बरे वाईट करुन व तुमचे नाव पसरवुन टाकेन अशी धमकी दिली. अशा आशयाच्या हाजमी मेहंदी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सत्यम साहू विरोधात सोमवारी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.

 

Protected Content