पारोळा युवा परिषदेतर्फे गुणवंतांचा सन्मान

 

पारोळा, प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संक्रमणामूळे यंदा दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सार्वजनिक स्वरुपात झाला नाही; मात्र जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या माध्यमातून पारोळा तालूका भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत तालूक्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या १३ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे राज्य उपाध्यक्ष कमलेश सोनवणे होते. श्री. सोनवणे यांनी ध्येयवेडे माणसंच इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं तो इतिहास वाचतात, आता तुम्हाला इतिहास घडवणारं व्हायचंय की इतिहास वाचणार हे तुम्ही ठरवा व भविष्यात योग्य दिशेने मार्गक्रमण करा, असे सांगितले.

प्रमूख पाहुणे म्हणून युवा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिवाजी बाविस्कर, मराठा सेवा संघाचे संदीप पाटील, डॉ. निलेश पाटील आदींनी मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दहावीत यश संपादन केलेल्या रविंद्र पाटील, हर्षल नावस्कर, भावेश पाटील, अभय सैंदाणे, दिव्या सुर्यवंशी, प्रतिक शिंदे, अजित थोरात, अजय महाजन, राजश्री शिंदे, ओम थोरात, मैथिली पाटील, सिध्दार्थ जगताप, जिज्ञासा पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, शालेय साहित्य व गुलाबपुष्प देऊन गौरव केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढुन पुढिल काळात चांगले यश मिळण्याची उर्जा मिळाली.

तसेच पारोळा येथील कांताई क्लिनिकचे संचालक डॉ. निलेश पाटील यांनी कोरोना काळात शहरासह तालूक्यातील रुग्णांना उत्तम सेवा देऊन सेवाभाव जपला आहे. या कार्याप्रित्यर्थ डॉ.पाटील यांचा कोरोना योध्दा म्हणून पारोळा युवा परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. यशस्वितेसाठी तालूकाध्यक्ष कुंदन पाटील, तालुका उपाध्यक्ष अक्षय निकम, तालूका महासचिव प्रशांत पाटील, तालूका सचिव भारत पाटील, उमेश पाटील, लोकेश पवार, समाधान मगर, तालूका कोषाध्यक्ष सनी निकम, तालूका समन्वयक हेमंत निकम, शुभम पाटील, प्रमोद सूर्यवंशी, अजय बोरसे योगेश पाटील या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तालूकाध्यक्ष कुंदन पाटील यांनी तर सूत्रसंचालन तालूका सचिव लोकेश पवार यांनी केले.

Protected Content