शिवसेना संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत आज बैठकांचे सत्र

जळगाव प्रतिनिधी । शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेच्या महत्वाच्या तीन बैठका होत असून याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे काल दुपारी जळगावात दाखल झाले. त्यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मोजक्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा केली. तर आज त्यांच्या उपस्थितीत जिल्हा शिवसेनेच्या तीन बैठका घेण्यात येणार आहेत. अजिंठा विश्रामगृहात या तीन बैठका होणार आहेत.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे संभाव्य पक्षांतर, जिल्हा शिवसेनेतील अंतर्गत कलहाचे सूर आणि जळगाव महापालिकेतील स्थिती याबाबत संजय सावंत यांच्या उपस्थितीतील बैठकीत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.