भाग्यश्री नवटके यांना पोलीस दलातर्फे निरोप

जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांना पोलीस दलातर्फे एका छोटेखानी कार्यक्रमात निरोप देण्यात आला.

अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांची नुकतीच बदली झाली आहे. रविवारी चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्याकडे पदभार देऊन त्या कार्यमुक्त झाल्या. याप्रसंगी एका छोटेखानी कार्यक्रमात नवटके यांना निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती भाग्यश्री नवटके, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, चोपडा पोलिस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल, जळगाव शहराचे पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, भुसावळचे कार्यमुक्त डीवायएसपी गजानन राठोड, कुमार चिंथा हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भाग्यश्री नवटके यांचा शाल, श्रीफळ तसेच गणेशमूर्ती देवून सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात नुकतेच बदली झालेले भुसावळचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना भाग्यश्री नवटके यांनी जळगावात आपल्याला बरेच काही शिकायला मिळाल्याचे आवर्जून नमूद केले. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन देखील त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांनी केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!