जळगाव प्रतिनिधी । दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला महाविकास आघाडीने पाठींबा दिला असून व्यावसायिक व जनतेने यात सहभागी होण्याचे आवाहन आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आले.
उद्या शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधीच सहभाग दर्शविला आहे. या अनुषंगाने स्थानिक पातळीवर देखील या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रीत पत्रकार परिषद घेऊन जनतेला यात सहभागी होण्याची आवाहन केले.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, विलास भाऊलाल पाटील, काँग्रेसचे शाम तायडे, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवरांनी केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे हे शेतकर्यांना देशोधडीला लावणारे असून ते रद्द करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
खालील व्हिडीओत पहा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदबाबत मांडलेली भूमिका.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3408374789211584