अल्पवयीन मुलीची छेडखानी ; आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा

भुसावळ प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीची छेडखानी करणार्‍याला तीन वर्षे शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत सविस्तर घटना अशी की, सन २०१६ मध्ये ह्या प्रकरणातील आरोपी एकनाथ चावदस मोरे हा त्याचेच गावात व एकाच परीसरात राहणाऱ्या पिडीतेच्या घरी तीचे आईवडील नसल्याची संधी साधुन गेला व त्याने अल्पवयीन पिडीतेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तीने विरोध केल्याने तो निघून गेला, पिडीतेचे आईवडील कामावरून घरी आल्यानंतर तीने घटना कथन केली व त्यानंतर बोदवड पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध बाल अत्याचार प्रतीबंधक कायदा कलम ८ तसेच भादस कलम , ४ ५ २, ३५४, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याप्रमाणे कोर्टात बालअत्याचार प्रतीबंधक खटला क्र . १४ / २०१६ असा होता . चौकशी अंती कोर्टाने आरोपीस दोषी धरून बाल अत्याचार प्रतीबंधक कायदा कलम ८ अन्वये ३ वर्ष सक्तमजूरी व ३००० रू दंड तसेच भादस कलम ४ ५ २ अन्वये १ वर्षे सक्तमजूरी व २००० रु दंड तसेच भादस कलम ५०४ अन्वये १ महीना सक्तमजूरी व १००० रु दंड व ह्या दंडातील ५००० रु पिडीतेस नुकसान भरपाई म्हणून देण्याची शिक्षा सुनावली. ह्या प्रकरणात सरकार तर्के अॅड. विजय खडसे ह्यांनी कामकाज पाहील.

Protected Content