भुसावळ पालिकेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांची निवड ऑनलाईन सभेत बिनविरोध करण्यात आली.

पालिकेच्या विषय समिती सदस्यांची निवड मंगळवारी ऑनलाइन विशेष सभेत झाली. तहसीलदार दीपक धिवरे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. या ऑनलाइन विशेष सभेत भाजप व अपक्ष आघाडीचे गटनेते मुन्ना तेली व जनआधारचे उल्हास पगारे यांनी सदस्यांची नावे अधिकार्‍यांकडे दाखल केली. सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता वैद्यक व आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, नियोजन आणि विकास, महिला व बालकल्याण तसेच स्थायी समितीच्या सदस्यांची सर्व नावे पीठासीन अधिकारी तथा तहसीलदारांनी वाचली.
यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, सभा अधीक्षक शे. परवेज, उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, संगणक अभियंता अनिल गवारे, धीरज बाणाईते, पालिकेचे सभा लिपिक प्रमोद मेढे आदी उपस्थित होते.

दरम्यान, यात स्थायी समितीवर अ‍ॅड. बोधराज चौधरी, प्रतिभा पाटील व उल्हास पगारे यांची वर्णी लागणार आहे.
तर, बांधकाम समिती सभापतिपदी गटनेते मुन्ना तेली, शिक्षण समितीवर मुकेश गुंजाळ, स्वच्छता व वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीवर प्रा. दिनेश राठी, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीवर किरण कोलते, नियोजन आणि विकास समितीवर पदसिद्ध उपनगराध्यक्ष शे. सईदा शफी, महिला व बालकल्याण समितीवर अरुणा सुरेश सुरवाडे यांची सभापतिपदी वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content