उद्यापासून सुरू होणार शाळा; नववी ते बारावीपर्यंतचे उघडणार वर्ग ( व्हिडीओ )

जळगाव सचिन गोसावी । जिल्ह्यातील शाळा उद्या अर्थात ८ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व नियमांचे पालन करून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होत असून याबाबत जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

लॉकडाऊननंतर आता जिल्ह्यातील शाळा खुल्या होणार असल्याचे निश्‍चीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाने उद्या पासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने शाळा निर्जंतुकीकरणाची कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहे. त्यामुळे उद्या पासून जळगाव जिल्ह्यात शाळा उघडणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले की, जिल्ह्यात नववी ते बारावीच्या दोन लाख विद्यार्थी असून शाळा सुरू करण्यासाठी आणि आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी १ लाख पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहे. जिल्ह्यात एकूण ८५७ शाळा असून यापैकी ८५४ शाळांची तयारी पूर्ण झाली आहे. यात २ लाख ७ हजार ९१ विद्यार्थी तर ९ हजार ६६७ शिक्षक असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी आज दिली. जिल्ह्यात उद्या शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधित शाळांना तयारी करण्यास सांगितले आहे. शाळा सुरू करण्यासाठी तयारीची पाहणी गेल्या आठवड्यापासून शिक्षण विभागाचे अधिकारी विविध ठिकाणी भेटी देऊन करत आहेत. आतापर्यंत ८५६ शाळांची तपासणी झाली आहे.

शिक्षणाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार मुलांच्या शरीराचे तापमान मोजण्याची व्यवस्था आहे किंवा नाही याची तपासणी करावी यानुसार सर्व शाळांमध्ये तपासणी करण्यात आली आहे तसेच सर्व शिक्षकांच्या कोबी चाचण्या देखील करण्यात आले आहेत एकूण ८५७ असून ८५४ शाळांची तयारी पूर्ण झालेली आहे दुपारपर्यंत उर्वरित शाळांच्या देखील रिपोर्ट येणार आहे. शाळेमध्ये सध्या इंग्रजी विज्ञान आणि गणित हे विषय शिकवण्यात येणार आहेत.

एकूण शाळा : ८५७
विद्यार्थी : दोन लाख ७ हजार ९१
शिक्षक : नऊ हजार ६६७
शिक्षकेतर कर्मचारी : तीन हजार २६१
कोरोना चाचणी झालेले शिक्षक : आठ हजार ८८६
पॉझिटिव्ह शिक्षक : १४
संमतीपत्र दिलेले पालक : ५२ हजार ५२७
बैठका घेतलेल्या शाळा : ७०२
निर्जंतुकीकरण झालेल्या शाळा : ६२५
शाळा सुरू करण्यास होकार दिलेल्या शाळा : ६६८

खालील व्हिडीओत पहा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिलेली माहिती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3846621998703410

Protected Content