डॉ. उल्हास पाटील विदयालयात लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे  आयोजन डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय येथील कृषी कन्या वैशाली रोडे,सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर, सुप्रिया बडे यांच्याकडून करण्यात आले. यावेळी पशु चिकित्सक डॉ. प्रमोद सुरवडे (पशुवैद्यकीय दवाखाना फैजपूर) यांचे मार्गदर्शन लाभले.

 

यावेळी या भागातील अनेक जनावरांची तपासणी कृषी कन्यांनी केली. उपस्थीतांना मार्गदर्शन करतांना लम्पी त्वचा रोगाबददल माहिती देतांना लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग किटकांपासून पसरतो. माश्या आणि डास तसेच विशिष्ट प्रजातीच्या उवांमुळे लम्पी आजार पसरतो.या आजाराची लक्षणे लम्पी त्वचा रोग झालेल्या जनावरांमध्ये ताप येणे, चारा न खाणे, त्वचेवर गाठी येणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. तसेच डोळे आणि नाकातून स्त्राव येणे, तोंडातून लाळ गळणे, दुध उत्पादन कमी होणे, अशी लक्षणे आढळून येतात.  या आजारामुळे जनावरे दगावू नये यासाठी गोठ्यात माशा, डास होणार नाही याची काळजी घ्यावी.

 

गोठ्यात स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून विभक्त ठेवावे. बाधित जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. याबददल माहिती देखिल देण्यात आली. या तपासणीसाठी डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सपकाळे, डॉ. शैलेश तायडे, डॉ. अशोक चौधरी, डॉ. एस एम पाटील यांनी देखिल मार्गदर्शन केले. यावेळी कृषि महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमानंतर परिसरातील जनावरांची तपासणी तज्ञांकडून करण्यात येवून मार्गदर्शन देखिल करण्यात आले.

Protected Content