कोरपावली विविध कार्यकारी संस्थेची बॅक पातळीवर १००% कर्ज वसुली

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली येथील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सह संस्थेला बॅक पातळीवर दि. ३१ मार्च २०२२ला चेअरमन राकेश वसंत फेगडे यांच्या नेतृत्वाखाली १०० टक्के कर्ज वसुलीत यश आले आहे.

कोरपावली विविध कार्यकारी सेवा सह संस्थेला बँक पातळीवर कांदे केळी कर्ज १ कोटी ३८ लाख , मृग केळी कर्ज ४३ लाख २५ हजार ६८० रूपये तर कापुस कर्ज१० लाख ११ हजार ४५७ रूपये प्रमाणे एकुण १ कोटी ९२ लाख ३५ हजार ६८७ अशी १००% कर्ज वसुली झाली आहे. यासाठी संस्थेचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे नवनिर्वाचीत संचालक मंडळ, सचिव मुकुंदा तायडे व सर्व कर्मचारी यांनी संपुर्ण प्रक्रीया राबविण्यासाठी महत्वाचे परीश्रम घेतले. या कामासाठी त्यांना ज्या शेतकरी सभासदांनी वेळेवर घेतलेले कर्ज भरले त्या त्या शेतकऱ्यास शुन्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून मिळाले आहे  व ज्या शेतकरी सभासदांनी वेळेवर कर्ज भरलेले नाही अशा शेतकऱ्यांना व्याजाने कर्ज मिळेल अशी माहीती चेअरमन राकेश फेगडे यांनी देवुन वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले. आज रोजी यावल तालुक्यातील कोरपावली येशील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या या बँक कर्जमुक्तीच्या कार्यामुळे शेतकरी हितासाठीचे निर्णय घेणाऱ्या सदैव तत्पर असणाऱ्या ही संस्था असल्याचे या संस्थेची वेगळी प्रतिमा निर्माण झाली असल्याने संस्थेने मिळवलेल्या या नांव लौकीकामुळे ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी सभासदांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

Protected Content