शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थीनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

फैजपूर , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील तीन विद्यार्थिनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बी. एड. जनरल परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकल्या आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एप्रिल- मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या बी. एड. जनरल या परीक्षेत फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयातील (विनाअनुदानित) तब्बल तीन विद्यार्थिनींनी विद्यापीठात पहिल्या पाच मध्ये गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळविला. विद्यापीठांतर्गत शिक्षणशास्त्र या शाखेतून एकूण १५११ विद्यार्थ्यांनी एप्रिल-मे २०२१ मध्ये परीक्षा दिली होती. या परीक्षेची विद्यापीठांतर्गत गुणवत्ता यादी दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये येथील शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयातील संज्योत सुधाकर गोसावी हिला २००० गुणांपैकी १८९७ गुण मिळवून द्वितीय क्रमांक आली तर मीना वामन बेंडाळे हिला १८८२ गुण मिळवून तृतीय व नूतन योगेश हिला कोल्हे १८७० गुण मिळवून तीने पाचवा क्रमांक मिळविला. या विद्यार्थिनींच्या अभूतपूर्व यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष आ. शिरीष मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव प्रा. एम. टी. फिरके, व संचालक मंडळ, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पिंगला एच. धांडे, प्रा. डॉ. शशिकला डी. मगरे, प्रा. व्ही. आर. तायडे, प्रा. डॉ. स्वाती तायडे, प्रा. यू. आर. पाटील यांचेसह शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Protected Content