गोदावरी व डॉ. वर्षा पाटील महाविद्यालयाची एक दिवसीय मॅरेथॉन स्पर्धा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव व डॉ.वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन जळगाव यांच्या संयुक्तरित्या एक दिवसीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी इंजिनीरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एच.पाटील उपस्थित होते त्यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेस सुरवात केली. उपस्थितांना संबोधताना ते म्हणाले की यावर्षी आपण स्वातंत्र्याचे 75वे वर्ष साजरे करत आहोत. ही मॅरेथॉन म्हणजे आपले देशाप्रती असलेले प्रेम दर्शवते.

यावेळी गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी उपस्थितांना सांगितले की सर्व प्रकारच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्यामधील आत्मविश्वास, नेतृत्व कौशल्य इत्यादी गुणांचा विकास होण्यास मदत होते.
या स्पर्धेचा मार्ग गोदावरी इंजिनीअरिंग कॉलेज ते गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयापर्यंत केलेले होते.

या स्पर्धमध्ये मुलींमधून काजल भोळे, उन्नती तांबे, शिवानी हेलकर अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा तसेच मुलांमधून पारस सपकाळे, अविनाश जाधव, धनंजय पाटील अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रम पटकावला. यावेळी डॉ.वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

Protected Content