कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने २ पेशंट आढळले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात २ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. तर दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जिल्ह्यात जळगाव शहर आणि भुसावळ तालुक्यात प्रत्येक १ असे एकुण २ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ५२४ कोरोना रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९१९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १४ कोवीड रूग्ण उपचार घेत आहे. तर आतापर्यंत २ हजार ५९१ बाधितांचा मृत्यू झाला आहे

 

Protected Content