व्यवसाय करण्यासाठी विवाहितेकडून पाच लाखाची मागणी

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्लॉटींचा व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह नऊ जणांविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील हंबर्डी येथील माहेर असलेल्या दिपाली सिद्धार्थ ताजणे (वय-२७) यांचा विवाह औरंगाबाद येथील सिद्धार्थ वेंकटराव ताजणे यांच्याशी २०१८ मध्ये रितीरिवाजानुसार झाला लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस चांगले केल्यानंतर पती सिद्धार्थ ताजणे याने प्लॉटिंगचा व्यवसाय करण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विवाहितेने पैसे आणले नाही. याचा राग येऊन सिध्दार्थ योने शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासू, ननंद आणि नंदोई यांनी सतत टोमणे मारणे सुरु केले. या त्रासाला कंटाळून विवाहिता हंबर्डी येथे माहेरी निघून आल्या. बुधवार २० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती सिद्धार्थ वेंकटराव ताजणे, सासू निर्मलाबाई व्यंकटराव ताजणे, ननंद माधुरी गणेश देहाडे, नंदोईभाऊ गणेश विलास देहाडे, भाची ऋतुजा नंदकिशोर वानखेडे रा. औरंगाबाद, ननंद रागिनी नागसेन तारे, नागसेन पांडुरंग तारे रा. मुकुंदवाडी जालना रोड, औरंगाबाद, ननंद वैशाली नंदकुमार वानखेडे आणि ननंद सोनाली रवीकुमार वाघमारे दोन्ही रा. औरंगाबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल देविदास सूरदास करीत आहे.

Protected Content