सतीष घुलेंची उमेदवारी जाहीर करणे म्हणजे आंबेडकरी समाजाचा अपमान : जगन सोनवणे

ripai party

भुसावळ प्रतिनिधी । माजी आ.संतोष चौधरी यांनी सतीष घुलेची उमेदवारी जाहीर करुन पक्षश्रेष्टी व आंबेडकरी समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप पीआरपीचे जिल्हा अध्यक्ष जगन सोनवणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, संतोष चौधरी राजकीय दृष्ट्या संपलेला माणुस आहे. कारण आज संतोष चौधरी यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. त्याच्या सोबत फक्त ३ नगरसेवक आहेत. आणि पुर्वीचे सर्व लायक प्रामाणिक माणसे जगन सोनवणे, आमदार संजय, सावकारे, विजय चौधरी, शफि पहेलवान मुन्ना तेली, युवराज लोणारी, पिंटु कोठारी, राजु नाटकर, राजु आवटे, स्व.उदयसिंह काके, प्रमोद सावकारे, सुरेश कोलते हे दिग्गज त्यांच्या कडुन फुटलेले आहेत. त्यांच राजकीय वजन संपलेला आहे आणि रावेर यावल विधानसभा मतदार संघात जनतेचा अनिल चौधरींना पाठींबा नाही. कारण संतोष चौधरी यांनी सतीष घुलेची उमेदवारी जाहीर करुन आंबेडकरी समाजाशी गद्दारी केली आहे. आणि भिमसैनिक अनिल चौधरी यांनी नात्यांची जागा निवडणुकीत दाखवून दिली. यामुळे आता भिमा कोरेगाव घडविल्याशिवाय राहणार नाही. अशी माहिती ‘रिप.नेते जगन सोनवणे यांनी दिली आहे.

माजी आ.संतोष चौधरी यांनी जेव्हा त्यांचे सुपूत्र सचिन चौधरीने नगराध्यक्ष पदाची निवडणुक जनाधारतर्फे लडविली होती. तेव्हा त्यांना राष्ट्रवादी पक्ष का दिसला नाही…? सोयीनुसार राजकारण व पक्षांतर करणाऱ्या व दलबदलु संतोष चौधरी यांना पक्षश्रेष्टी ही कंटाळली आहे. हिम्मत असेल तर जनाधारतर्फे विधानसभेचा तुमचा उमेदवार जाहीर करा. कारण आज फक्त जनाधारचे त्यांच्या कडे ३ च नगरसेवक त्यांच्या सोबत आहे. १६ नगरसेवक नाहीत. जर का संतोश चौधरीला भुसावळची जागा मिळल्यास मी १ लाख २१ हजार रुपये गरीब शेतकरी
कुटूंबास देणार असल्याचं व्यक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे. राष्ट्रवादी रिपब्लिकन जनशक्ती मेळावा मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण, भडगाव, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा आणि भुसावळ या सात ठिकाणी आमदार प्रा.जोगेन्द्र कवाडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी रिपब्लिकन जनशक्ती मेळावा पी.आर.पी. तर्फे घेण्यात येणार आहे. भुसावळच्या जागे बद्दल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शदरचंद्र पवार आणि अजित
पवार यांनी मित्र पक्षाच्या आघाडीच्या बैठकित भुसावळची जागा पी.आर.पी.ला सोडली आहे. आमदार प्रा. जोगेन्द्र कवाडे आणि जगन सोनवणे असे मुंबईच्या बैठकीला हजर होतो.

जिल्हा कमिटीची पीपल्स रिपब्लीकन पार्टी व विविध १० संघटनांची संयुक्त बैठक संपन्न झाली व नंतर दु. २ वा भिमालय पक्ष जनसंपर्क कार्यालयात कामगार नेते, राज्य पी.आर.पी. प्रदेश महामंत्री आणि जळगांव जिल्हा अध्यक्ष, नगरसेवक सभापती जगन सोनवणे व वरणगाव माजी पं.स.सदस्या पुष्पाताई सोनवणे (नगरसेविका भुसावळ) यांनी पत्रकार
परिषद घेतली.

Protected Content