पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याला विरोध : कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन

 

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रद्रोही असल्याचा आरोप करत आज कॉंग्रेस व राष्ट्रवादीने त्यांच्या पुणे दौर्‍यात शहरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. यात गो बॅक मोदी असे नारे देण्यात येत आहेत.

पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाकडून मोदींचा विरोध केला जात आहे. काँग्रेसकडून ‘महाराष्ट्रद्रोही मोदी परत जा’ असे बॅनर लावण्यात आले आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते अलका चौकात आंदोलन करत असून ”महाराष्ट्रद्रोही मोदी परत जा” अशी घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधानांना काळे झेंडे देखील दाखवण्यात येणार आहे. याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं असून पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गात कार्यकर्ते अडथळा आणणार नाहीत याची काळजी पोलिस घेत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच जनतेचे रक्षण हाच आपला धर्म मानला आहे. मोदी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये देशांच्या मुलांना मृत्यूच्या दारात सोडून पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. यामुळे पुणे शहर मोदींचे स्वागत #GoBackModi ने करत आहे, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींकडून पुणे मेट्रोचं उद्घाटन हा केवळ देखावा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला काँग्रेससोबतच राष्ट्रवादीनं विरोध केला आहे. आंबेडकर पुतळा परिसरात राष्ट्रवादीचं मूक आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

Protected Content