डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभिकरण दर्जेदार करा, अन्यथा आंदोलन ; भाजपाचे निवेदन !

 

धरणगाव, प्रतिनिधी । शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. या स्मारका सभोवताली संपूर्ण आरसीसी स्ट्रक्चर बांधकाम करून अद्यावत सुशोभीकरण करावे, लोखंडी रेलिंग चांगल्या दर्जाची बसवावी, ग्रेनाइट मार्बलचा वापर करावा, अशा मागण्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

निवेदनाचा आशय असा की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाभोवती सुरु असलेले काम तात्त्पुरता स्वरूपाचे दिसुन येत आहे. जुन्या बांधकामावरच नवीन बांधकाम सुरु आहे. त्याचबरोबर लोखंडी रेलिंग सुध्दा जुनीच आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टिच्या वतीने निवेदन देण्यात आले की बाबासाहेबांच्या स्मारका सभोवताली पूर्ण आरसीसी स्ट्रक्चर बांधकाम करून अद्यावत सुशोभीकरण करावे,लोखंडी रेलिंग चांगल्या दर्जाची बसवावी, ग्रेनाइट मार्बलचा वापर करावा. स्मारकाच्या परिसरात फ्लेव्हर ब्लॉक बसवावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन भारतीय जनता पक्ष करेल असे निवेदन नगरपालिकेत मुख्याधिकारी यांना देण्यात आले. त्यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते शिरीष बयस, तालुकाध्यक्ष सजंय महाजन, पुनिलाल महाजन, शहराध्यक्ष सुनील वाणी, दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, गुलाब मराठे, सुनील चौधरी, कन्हैया रायपुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content