गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची कामना करत ११ ते १३ सप्टेंबरपर्यंत इंडक्शन प्रोग्राम आयोजीत करण्यात आला असून थाटात उदघाटन करण्यात आले.

प्रथम दिवशी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग पाटील मुख्य अतिथी, तर गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्राध्यापक दीपक झांबरे, अभियांत्रिकी, अधिष्ठाता प्राध्यापक हेमंत इंगळे, तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्राध्यापक अतुल बर्‍हाटे सह सर्व विभाग प्रमुख उपस्थीतीत गणेश वंदना व सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

प्रथम सत्रात कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ.पराग पाटील यांचेसह मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील सर यांनी संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या विविध अभियांत्रिकी शाखा एकमेकांशी जोडलेल्या आणि प्रत्येक शाखेचे महत्त्व आणि संस्थेकडे उपलब्ध संसाधने याबाबत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महाविद्यालयात कोणकोणते उपक्रम राबविले जातात व विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांना जसे खेळ, स्पर्धा यांना बाहेर जाण्यासाठी प्रोत्साहित करतात याबाबत माहिती दिली.शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रा. डॉ. पराग पाटील यांनी तांत्रिक शिक्षणाची परिस्थीती तसेच आयसीटीई, डीटीई, एमएसबीटीई यासारख्या संस्थाबाबत माहिती दिली.दुपारच्या सत्रात मुख्य अतिथी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे विद्युत आणि दूरसंचार विभाग प्रमुख प्रा. के.पी. अकोले  उपस्थित होते. प्रा. अकोले महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अभ्यासक्रमाचे सदस्य व प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.कार्यक्रमाची धुरा सांभाळत चालू के योजना अभिमुखता या मुद्द्यावर मार्गदर्शन केले.दि १३ रोजी कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वेणू फिरके व प्राध्यापक सुरज चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक राखी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम दिवशीचा कार्यक्रम व्यवस्थित रीत्या पार पडला.

Protected Content