बिग ब्रेकींग : नूतन मराठा वाद प्रकरणी गिरीश महाजन, सुनील झंवरसह इतरांविरूध्द तक्रार दाखल

जळगाव प्रतिनिधी । नूतन मराठा संचालकांच्या दोन गटांमधील वादात धमकावल्या प्रकरणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन व बीएचआर प्रकरणी फरार असलेल्या सुनील झंवरसह भोईटे गटाच्या संचालकांवर निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यात गिरीश महाजनांचे खंदे समर्थक रामेश्‍वर नाईक यांचेही नाव असून अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी ही तक्रार केली आहे.

याबाबत वृत्त असे की जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमधील वाद सर्वश्रुत आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाला नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पायउतार केल्यानंतरही भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत असून दोन्ही गटांमध्ये आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे. या पार्श्‍वभूमिवर, मध्यंतरी भोईटे गटाला तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचा पाठींबा असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत होती. याच अनुषंगाने दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, जिलहा मराठा विदया प्रसारक सहकारी समाज मर्यादीत ,जळगाव हि संस्था सहकार कायदयानुसार नोंदणीकृत संस्था असुन विश्‍वस्त कायदयान्यये सुध्दा नोंदणीकृत आहे. परंतु संस्थेची निवडणुक व कामकाज सहकार कायदयानुसार चालते. सदर संस्थेचे एकुण २८ माच्यमिक शाळा,१० किमान कौशलय महाविदयालय,१० ज्युनिअर कलेज,०१ डि एड कलेज,०१ प्रायमरी स्कुल्ल,०३ सिनियर कलेज असुन या संस्थेची सर्व मालमत्ता जबळपास ०१ हजार कोटी रूपये आहे. जळगाव,वरणगाव,यावल या तिन सिनीअर कॉलेजवर उत्तर महाराष्ट्र विदयापिठ,जळगाव यांनी सन २०११ चे संचालक मंडळाच्या गैरकारभार व गैरवर्तणुकीबाबत सविस्तर अहवाल उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांकडे सादर केला होता. उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने दि.१६/०६/२०१२ रोजी जळगाव,वरणगाव,यावल या तिन सिनीअर कॉलेजवर प्रशासक नेमले. संस्थेचे संचालक हे जिलहा उपनिबंधक सहकारी संस्था,जळगाव यांनी दि.२३/१२/२०११ रोजी बरखास्त केले.सदरचे आदेश दि.२८/०५/२०१२ रोजी विभागीय सहनिवंधक,सहकारी संस्था,नाशिक यांनी कायम केले. सदरच्या आदेशास मा.सहकार मंत्रांकडे आव्हान दिले.परंतु दि.१७/०७/२०१२ रोजी सहकार मंत्र्यांनी वरील दोन्ही आदेश कायम कर न संस्थेचा रिव्हिजन अर्ज फेटाळला. जिल्हा उपनिबंधकांनी नियुक्त केलेल्या तिन शासकीय प्रशासक मंडळाने पोलीसांसमक्ष संस्थेचा ताबा दि.१८/०७/२०१२ रोजी घेतला व तसा पंचनामा केला.सदर मंडळात तालुका उपनिबंधक जिलहा,जळगावचे निळकंठ ज्ञानदेव करे,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पाचोराचे के पी पाटील तर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,भडगावचे जी.एच पाटील यांचा समावेश होता.सदर प्रशासकीय मंडळाने आपले कामकाज दि.१८/०७/२०१२ रोजी सुर कर न याबाबत
त्यांनी सर्व संबंधीत शासकीय यंत्रणांना पदभार स्विकारलयाचे कळविले होते. विशेष लेखा परिक्षक यांचे कडेस पदभार दिलयाचे जिलहा उपनिबंधक यांनी आदेश काढले,व पाटील यांनी करे यांचेकडुन पदभार स्विकारला. एम डी.पाटील यांचेनंतर एन. डी. गाधेकर यांची सदर संस्थेवर प्रशासक म्हणुन निपुक्ती जिलहा उपनिबंधकांनी केली. श्री गाधेकर यांनी सदर संस्थेची निवडणुक घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग सहकार पुणे यांना विनंती केली. महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग सहकार ने निवडणुक पार पाडण्यासाठी मतदारांची यादी तयार केली. सदर अंतीम मतदार यादीत वरील सर्व आरोपींचे सदस्य नसल्याने त्यांचे नाव मतदार म्हणुन नाव मतदार यादीत नव्हते.

दरम्यान, महाराष्ट्र निवडणुक आयोग सहकारने दि.१०/०५/२०१५ रोजी सदर संस्थेची निवडणुक घेवुन दि.११/०५/२०१५ रोजी निकाल घोषीत केला. यात दि.१५/०५/२०१५ रोजी नरेंद्र भास्करराव पाटील (सध्या मयत), विजय भास्करराव पाटील व इतर १८ या व्यक्ती निवडुन आलयाचे घोषीत केले व त्या बाबतचे राजपत्र प्रसिच्द केले.निवडुन आलेल्या संचालकांमधुन चेअरमनची निवडणुक दि.२२/०५/२०१५ रोजी झाली,त्याचदिवशी म्हणजे दि.२२/०५/२०१५ रोजी एन. डी. गाधेकर यांनी संस्थेचा कारभार चेअरमन नरेंद्र पाटील मयत यांचेकडे सुपुर्द केला. तसेच तिन सिनीअर कॉलेजच्या स्वतंत्र प्रशासकांनी सुच्दा त्यांचा कालावधी संपल्यानंतर दि.२०/०९/२०१६ रोजी श्री.साळी यांनी चेअरमन नरेंद्र पाटील मयत यांचेकडे कारभार सुपर्द केला.तसेच दि.१७/०९/२०१६ रोजी श्री.मानेकर व श्री.ठोंबरे यांनी चेअरमन नरेंद्र पाटील यांचेकडे त्यांचा कारभार सुपुर्त केला.यानंतर चेअरमन नरेंद्र पाटील यांचेकडे संस्थेचा चार्ज देवुन तसा दस्त केला व शासकीय यंत्रनेला कळविले.निवडुन आले बाबतचे चेंज रिपोर्ट २०१५ मध्येच सहाय्यक धर्मदाय आपुक्त,जळगाव यांचेकडेस दाखल केले.नरेंद्र पाटील मयत त्यांचे संचालक मंडळ विश्‍वस्त हेच चार्ज घेतल्यापासून संपुर्ण संस्थेचे दैनंदीन कामकाज पाहत होते.

दरम्यान, संस्थेचे कामकाज पाहत असतांना निलेश रणजित भोईटे आला व त्याने मला संस्थेचे माजी सचिव तानाजी भोईट यांनी आपणास पुणे येथे बोलाविले असल्याचे सांगितले. त्याने संस्थेचे जुने रेकर्ड ते देणार असुन ते आपण घेवून जावे असे म्हणुन तानाजी भोईटेच्या फ्लॅटचा पत्ता व फोन नंबर दिला. संबंधीत बाब विजय पाटील यांनी त्यांचे भाऊ नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करून पुणे येथे कोथरूड येथील हॉटेल किमया येथे येण्यास सांगीतले.आम्ही तेथे पोहचल्यावर हॉटेलच्या बाहेर निलेश भोईटे हा उभा होता.तो आम्हाला हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर घेवुन गेला. तेथे विरेंद्र भोईटे, तानाजी भोईटे, शिवाजी भोईटे व रामेश्‍वर नाईक हज़र होते. रामेश्‍वर नाईक याने तानाजीला आपला विषय सांगा म्हणून सांगीतले.

त्यावर तानाजी भोईटे विजय पाटील यांना म्हणाले की,सदरची संस्था गिरीशभाऊ यांना हवी आहे. ही संस्था आमच्या ताब्यात संस्था देवुन टाका. भाऊ एक कोटी देण्यास तयार आहे. विजय पाटील व महेशने त्यास स्पष्ट नकार दिला.मी त्यांना संस्थेचे दप्तर कुठे आहे म्हणुन विचारले असता निलेश भोईटेने गिरीश महाजन यांना व्हॉटसअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल लावला. यात गिरीश महाजन यांनी आपल्याला सर्व संचालकांचे राजीनामे घेवुन संस्था ही निलेशच्या ताब्यात देवुन विषय संपवुन टाक. विजय पाटील यांनी असे होणार नाही असे म्हणुन त्यास नकार दिला. यावर विजय पाटील व महेश उठण्याचा प्रयत्न करू लागताच तानाजी भोईटेने नाराज होवु नका चला तुम्हाला रेकॉर्ड देतो असे सांगितले. त्यावर ठिक असल्याचे सांगून विजय पाटील व महेश बाहेर आले. त्यांच्या मागे विरेंद्र,तानाजी,निलेश,शिवाजी व रामेश्‍वर आले. हॉटेलच्या बाहेर कार आल्यावर विरेंद्रने माझ्या गाडीची चाबी निलेशला द्यायला सांगीतले. तुम्हाला रस्ते कळणार नाही म्हणुन निलेशने त्यांच्याकडुन आमच्या गाडीची चाबी घेतली.आणि मला व महेशला स्कोडा एम एच १४ बी सी ६००० या गाडीच्या मागच्या सिटवर बसण्यास सांगीतले.मी महेश व विरेंद्र मागे बसलो व रामेश्‍वर पुढे बसला.शिवाजी भोईटे हा निलेश सोबत आला.तानाजीने निलेशला माझी गाडी घेवुन सदाशिव पेठेतील अपार्टमेंटला येण्यास सांगीतले.तानाजीने गाडी काढली व आमच्या गाडीच्या मागे निलेश माझी घेवुन येवु लागला. व ते सर्व एका फ्लॅट वर आम्हाला घेवुन गेले. तेथे अगोदरच जयवंत भोईटे,निळकंठ काटकर, गणेश कोळी उर्फ गणेश मेंबर, सुनिल झंवर, विराज भोईटे उपस्थित होते. या मागोमाग निलेश भोईटे आला व त्याने दरवाजा बंद कर न घेतला यावेळी लगेचच रामेश्‍वरने मला डोक्याचे मागच्या बाजुस जोरात चापट मारली.व माझ्या मानेजवळ चाकु लावुन मुकाट्याने बसुन रहा अन्यथा ठार कर न टाकु अशी धमकी दिली.व महेशला सुध्दा रामेश्‍वरने मुकाट्याने बसण्यास सांगीतले. आम्ही दोन्ही हा प्रकार पाहुन भयभीत झालो होतो.त्यानंतर रामेश्‍वरने गळ्याला लावलेला चाकु पोटाला लावला.

यानंतर सुनिल झंवर हा हॉलमध्येच मला दम देवु लागला व संस्था सोडुन द्या. मुकाट्याने सर्व संचालकांचे राजीनामे घेवुन निलेश कडे देवुन टाक अन्यथा परिणाम वाईट होतील. गिरीषभाऊंनी यांना बसविले आहे. हे तुला माहित नाही का ? गिरीषभाउंचा खास माणुस आहे. यावेळी विरेंद्र भोईटेने मला पायावर लाथ मारली व नरेंद्रला सांग सर्व संचालकांचे राजीनामे दया.रामेश्‍वरने पुन्हा माझ्या कानशिलात मारली व हरामखोर,भडव्या असा तयार होणार नाही याला एमपीडीए लावू अशी धमकी दिली.

या प्रकरणी अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील यांनी निंभोरात पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. यात-

०१ तानाजी केशव भोईटे,रा.ए -१./ए १००१ माणिकचंद, मलबार,कोंडवा,पुणे.
०२ निलेश रणजित भोईटे,रा.पुणे;
०३ विरेंद्र रमेश भोईटे,मु पो.भोईटेनगर,जळगाव;
०४ श्रीमती,अलका संतोष पवार,रा.हाउसिंग सोसायटी,जळगाव;
०५ श्रीमती,सुषमा गुलाबराव इंगळे,रा.शिवाजीनगर, मु.पो.तालुका, यावल
०६ विजया धर्मराज यादव,रा.आर के नगर,मु.पो.ता.अमळनेर;
०७ जयंत फकीरराव देशमुख, रा.हत्ती बिल्डींग,देशमुख गल्ली,मु.पो.ता.चाळीसगाव
०८ निळकंठ शंकर काटकर,रा.नगरदेवळा,ता,पाचोरा
०९ जयवंत पांडुरंग येवले,रा.शिवाजी नगर,मु.पो.ता. यावल, जि.जळगाव
१०परमानंद दंगल साठे,रा.चिंचोली,ता.यावल
११ भगवंतराव जगतराव देशमुख,रा.वरणगाव
१२ गोकुळ पिंताबर पाटील,रा.भादली, पो.कठोरा,ता.जि. जळगाव
१३ शंकरराव माणिकराव शिंदे,रा.मु.पो.तरसोद,ता.जि. जळगाव
१४ सुभाष रामचंद्र पाटील,रा.पिप्री बु. एरंडोल, जि.जळगाव,
१५ सुनिल भाउसाहेब भोईटे, रा.संभाजीपेठ, मु.पो.ता.यावल
१६ पुंडलीक यादव पाटील,रा.कामतवाडी,ता.अमळनेर,जि.जळगाव,
१७ एकनाथ फत्तु पाटील,रा.मोरगाव,ता.रावेर,जि.जळगाव
१८ किशोर जयवंतराव काळे,रा.हनुमान कलनी,जळगाव
१९ बाळु गुलाबराव शिर्के,रा.बोरावल गेट,मु पो.ता.यावल
२० जयवंत बाबुराव भोईटे,रा.विठ्ठल पार्क,मुक्ताईनगर
२१ शिवाजी त्रंबकराव घुले,रा.कळमसरे,ता.पाचोरा
२२ पितांबर शेनफळ पाटील,रा.मानराज पार्क,जळगाव.
२३ शिला मधुकर मराठे,रा.रवंजे बुता.एरंडोल,जि.जळगाव
२४ महेंद्र वसंतराव भोईटे,रा.कोल्हे नगर,जळगाव
२५ निलेश भोईटे यांचा हस्तक सुनिल गायकवाड
२६ शिवाजी केशव भोईटे, रा.पुणे
२७ सुनिल देवकीनंदन झंवर,रा.जळगाव
२८ गिरीश दत्तात्रय महाजन,रा.जामनेर
२९ रामेश्‍वर नाईक,रा.मुंबई, व तपासात निष्पन्न होणारे सर्व व्यक्ती
ज्यांनी गुन्हयाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत कर न त्यांनी पदाचा व अधिकाराचा गैरवापर व दुरूपयोग केला अशा सर्व व्यक्ती यांच्या विरूध्द ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी प्रत्यक्षात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. या संदर्भात अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते वकिलांकडे बसले असल्याचे सांगण्यात आले. तर गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

याबाबतची तक्रार आपण खालील लिंकवर क्लिक करून वाचू शकतात.
https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/PublishedFIRDetails.aspx?FIRNO=1Ciwwuuw1p3hOPWvcEDDaQ==&Lang_CD=rGgGlAiFprg=&IS_SAVE=BcZoodWlMPw=

Protected Content