केंद्रीय कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना ८ पानी पत्र

 

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा जचा २२ वा दिवस आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या नावे पत्र लिहिले आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे होणार आहेत याबाबत तोमर यांनी शेतकऱ्यांना संबोधित करत चर्चा केली आहे.

तोमर यांचे हे पत्र ८ पानी असून आपण ते शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी लिहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. खरे तर सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून हे आंदोलन संपवण्याचा कसोशीने प्रयत्न केला, मात्र सरकारला अजूनही यात यश आलेले नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून उलट ते अधिक व्यापक करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न दिसत आहे. याच कारणामुळे स्वत: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आघाडीवर येत शेतकऱ्यांना पत्र लिहिले आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदाच होईल, असा विश्वास तोमर यांनी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे.

तोमर यांच्या पत्रातील मुद्दे: असे आहेत — शेतकऱ्यांमध्ये भ्रम तयार केला जात आहे नवे कायदे लागू झाल्यामुळे यावेळी एमएसपीवर सरकारी खरेदीचे मागील सर्व विक्रम मोडले गेले आहे. सरकारने गेल्या ६ वर्षांमध्ये एमएसपीद्वारे जवळजळ दुप्पट रक्कम शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविली. एमएसपी सुरू आहे आणि सुरू राहील. मंडी सुरू आहेत आणि एपीएमसीला अधिक मजबूत केले जाईल. खुला बाजार घरबसल्या पिकाला चांगली किंमत देईल. मंडीचा पर्याय देखील असेलच कृषी मंड्यांचे आधुनिकीकरण करणार शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेतली जाणार नाही, मालकी हक्क शेतकऱ्यांचाच राहील.

Protected Content