जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे लहान मुलांच्या किरकोळ वादातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला असून या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील कुसुंबा येथील अक्षय सोनवणे याने दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक कोळी, आकाश कोळी व भीकन कोळी हे तीघे गल्लीत बसून शिवीगाळ करीत होते. त्यांना जाब विचारल्याचा राग आल्यामुळे तीघांनी थेट हातात चॉपर घेऊन हल्ला चढवला. घरात घुसून सर्व सामानाची तोडफोड केली. दगडाने वस्तु फोडल्या. त्यांच्या हल्ल्यात भास्कर सोनवणे, अक्षय सोनवणे, मुन्ना सोनवणे व कुंदाबाई सोनवणे हे चौघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या हाणामारीत दीपक, आकाश व भीकन कोळी हे देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.