लघु उद्योगाच्या नावाखाली फसवणूक; दांपत्याला अटक

जळगाव प्रतिनिधी । लघुउद्योग सुरू करण्याच्या नावाखाली लोकांची साडे तेरा लाख रूपयांची फसवणूक करणार्‍या संगीता निरज जोशी व निरज मदनलाल जोशी या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, संगीता निरज जोशी (वय ४७) व निरज मदनलाल जोशी (वय ४८, दोघे रा. रा. गुजर खर्दे, ता. शिरपूर) यांनी नातेवाईकांच्या मदतीने ५ जूलै २०१९ ते १ फेब्रुवारी २०२० या कालावधीत लोकांना लघुउद्योग स्थापन करण्याचे आमीष दाखवले. त्यासाठी विविध बचत गटांची स्थापन करुन लोकांकडून पैसे उकळले. यानंतर मात्र पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

याप्रकरणी वत्सला रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. यात या पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. तर, जागृती निरज जोशी ही मात्र अद्यापही फरार आहे. या दांपत्यास शनिवारी न्यायाधिश जी. जी. कांबळे यांच्या न्यायालयात हजर केले असता दोघांना १ मार्चपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले. यातील जागृती निरज जोशी ही फरार आहे.

Protected Content