उदय सामंत हल्ला प्रकरण : शिवसेना पुणे शहरप्रमुख अटकेत

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गटातील ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली असून अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

काल रात्री उशीरा राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असून यात वाहनाचा मागील बाजूचा काच फुटला आहे. सामंत हे तानाजी सावंत यांच्या घरून कात्रज येथे परत येत असतांना हा प्रकार घडला. या हल्ल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या गटाच्या नेत्यांनी याचा निषेध केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात रात्रीपासूनच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अटकसत्र सुरू केले आहे. यात शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली असून इतर काही जण देखील रडारवर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Protected Content