खा. उन्मेषदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेषदादा पाटील यांचा आज वाढदिवस असून यानिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी पातोंडा-बहाळ येथील क्लस्टरच्या कामाचे भूमीपुजन खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता अजिंठा चौफुली ते हॉटेल मैत्रेयाज या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपुजन करण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता भाजपच्या पक्ष कार्यालयात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

या सोबत आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत भडगाव, पाचोरा, जळगाव आणि चाळीसगाव येथे अनुक्रमे सकाळी ११; दुपारी १२; दुपारी ४ आणि सायंकाळी ७ वाजता डिजीटल कार्ड वाटप करण्यात येणार आहे. कोरोनाची आपत्ती लक्षात घेता खासदार पाटील यांनी अभिष्टचिंतनपर कार्यक्रम टाळून जनहितार्थ उपक्रमावर भर दिला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: