जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव भाजपा कार्यालयात जळगाव महानगर जिल्ह्याची संघटनात्मक बैठक आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत विविध संघटनात्मक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस डॉ. राधेश्याम चौधरी (जिल्हा सरचिटणीस), महेश जोशी (जिल्हा सरचिटणीस), विशाल त्रिपाठी (विधानसभा निवडणूक प्रमुख), ज्योतीताई निंभोरे (जिल्हा सरचिटणीस), रेखाताई वर्मा (प्रदेश सचिव), महिला मोर्चा अध्यक्ष भारतीताई सोनवणे, तसेच युवा मोर्चाचे महेश पाटील मंचावर उपस्थित होते. याशिवाय जिल्हा उपाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस, मोर्चा आघाडीचे प्रमुख, प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष, तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर बैठकीत पक्षाच्या पुढील उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणावर भर देण्यात आला. तसेच आगामी काळात पक्षाच्या उपक्रमांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत पक्षाच्या धोरणांवर चर्चा होत असताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले अनुभव व मते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या सर्व स्तरांवर एकात्मतेने काम करण्याची भावना यावेळी दिसून आली.