जळगावात महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी स्वागत

raju mama bhole news

जळगाव, प्रतिनिधी । भाजपा-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजुमामा) यांचा झंझावाती प्रचार दौरा सोमवारी शहरात पार पडला. सिंधी कॉलनी, कासमवाडी, नाथवाडा, जोशी कॉलनीत आ.भोळे यांना मतदारांशी संवाद साधला.

पंचमुखी हनुमान मंदिरात नारळ वाढविल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. ढोल-ताश्यांच्या गजरात व फटाके फोडून भव्य प्रचार रॅलीचा शुभारंभ झाला. रॅलीत आ.राजुमामा भोळे यांच्या प्रचारार्थ नगरसेवक भगत बालाणी, नगरसेविका रेश्मा काळे, चेतन सनकत, मनोज आहुजा, महेश चौधरी, जितेंद्र मराठे, मयुर कापसे, राजु मराठे, पार्वताबाई भील, प्रकाश बालाणी, सुशील हासवाणी, शिवसेनेचे अण्णा भापसे, चेतन शिरसाळे, प्रशांत नाईक, विशाल निकम, राहुल नेतलेकर, अरूण चांगरे, भाजपाचे सुशील वाधवानी, रिपाइंचे महानगरप्रमुख अनिल अडकमोल, रमाबाई ढिवरे, सागर सपकाळे, गीताबाई वाघ, पूनम नाथ, प्रताप बनसोडे, प्रतिभा भालेराव, शिवसेनेचे किरण भावसार यांच्यासह भाजपा – शिवसेना – रासप – आरपीआय(-) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. पंचमुखी हनुमान मंदिरापासून रॅलीला सुरूवात झाल्यानंतर कासमवाडी, गणेशवाडी, लाठी शाळा, नाथवाडा, जोशी कॉलनीमार्गे सिंधी कॉलनी येथे प्रचार रॅली समाप्त झाली.

ठिकठिकाणी जंगी स्वागत
महायुतीचे उमेदवार आ.राजुमामा भोळे हे रॅलीत जनआर्शिवाद मागण्यासाठी फिरत असताना महिलांनी त्यांचे औक्षण करून विजयाचा आर्शिवाद दिला. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून फटाके फोडून स्वागत करण्यात येत होते. अनेक ठिकाणी महायुतीच्या रॅलीत सहभागी असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी थंडपेयाची व्यवस्था देखील नागरिकांकडून करण्यात आली होती.

Protected Content