जळगाव जिल्हा सीनियर संघाची पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी सलामी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एमसीए इन्व्हिटेशन क्रिकेट लीग स्पर्धेत काल जळगाव संघाने सर्वात 346 धावा केल्या हे लक्ष्य घेऊन उतरलेला वाय एम सी ए चा संघ आपल्या पहिल्या डावात केवळ 189 धावात गारद झाला. त्यांच्यातील पृथ्वीराज याने नाबाद 101 धावांची खेळी केली. जळगाव संघातर्फे धवल हेमनानी याने ४७/४, कर्णधार जगदीश झोपे याने ३९/३ ऋषभ कारवा याने १३/२ तसेच नीरज जोशी याने ८/१ जळगाव संघातर्फे बळी मिळविले.
जळगाव संघाने वाय एम सी ए संघावर १५९ धावांची आघाडी घेतली व फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी पाचारण केले.

दुसऱ्या डावातही वाय एम सी ए संघ डळमळला व खेळ संपण्याच्या वेळेपर्यंत 31 षटकात सहा गडी गमावित केवळ 61 धावा केल्या. त्यांच्यातर्फे निशांत नगरकर याने 22 धावा केल्या तर जळगाव संघातर्फे रिषभ कारवा याने तीन बळी मिळविले. नचिकेत ठाकूर व पार्थ देवकर यांनी प्रत्येकी एक एक बळी टिपला.
हा दोन दिवसीय कसोटी सामना अनिर्णीत राहिला परंतु जळगाव संघाला पहिल्या डावातील आघाडीमुळे महत्त्वपूर्ण तीन गुण प्राप्त झाले. जळगाव संघाचे अभिनंदन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.

Protected Content