जळगाव क्रिकेट लीगची जोरदार तयारी

जळगाव प्रतिनिधी । शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जळगाव क्रिकेट लीगच्या आठही चमूची निवड करण्यात आली असून या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रतनलाल सी बाफना ज्वेलर्स प्रायोजित क्रिकेट लीगचे प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर जळगाव क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आठ संघ आणि यातील खेळाडूंची निवड निश्‍चित झाली आहे. यानंतर आता ही स्पर्धा सुरू होण्यासाठी फक्त काही दिवसांचाच अवधी उरला असून याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन ग्रुपमध्ये होणार असून त्यात ए गटात एम के वॉरियर्स, के.के. कॅन्स थंडर्स, रायसोनी अचिव्हर्स आणि वनिरा इगल्स यांचा तर बी गटात स्पेक्ट्रम चॅलेंजर्स, एस.के. हेल्थीमास्टर्स, खान्देश ब्लास्टर्स व कोझी कॉटेज स्ट्राईकर्स या संघाचा समावेश आहे.

जळगाव क्रिकेट लीगमध्ये खालीलप्रमाणे संघांची निवड करण्यात आली आहे.

१) कोझी कॉटेज स्ट्रायकर्स

मालक- प्रकाश चौबे, कोच- संतोष बडगुजर, आयकॉन खेळाडू- सशांक अत्तरदे. इतर खेळाडू – संकेत पांडे, सचिन पटेल, मंजित सोनार, स्वप्निल जाधव, गणेश रतिलाल लोहार, जितेंद्र नाईक, जावेद शेख, संदेश सुरवाडे, दिलीप विश्‍वकर्मा, नरेंद्र बावस्कर, सागर चौधरी, नयन दिलीप देशमुख, देवरे अविनाश, आमिर खान सलीम, शुभम पाटील, पवन तायडे, ओम तुकाराम मुंडे.

२) स्पेक्ट्रम चॅलेंजर्स

मालक – दीपक चौधरी, कोच- दीपक आर्डे, आयकॉन खेळाडू्- जगदिश झोपे. उर्वरित खेळाडू मेहूल इंगळे, रिझवान पठाण, निखिल पाटील, कल्पेश देसले, सुशील घेवांडे, इक्रमोद्दीन काझी, नितीन पाटील, मिलिंद सपकाळे, सगीर शाह, भालेराव दीपनकर, सौरभ चव्हाण, वैभव जाधव, सादीक देशमुख, फजल खान, अर्शद खान, स्वप्निल सोनवणे, प्रसन्न निळे.

३) वनिरा इगल्स

मालक -किरण महाजन, कोच – सूर्यकांत देवराज, आयकॉन खेळाडू वरुण देशपांडे. इतर खेळाडू मोहीत चोरडिया, सिद्धेश देशमुख, चंदन रणवे, शंतनू अग्रवाल, मनीष चौबे, सतीश चौबे, अक्षय कोल्हे, देवेंद्रसिंग पाटील, विशाल पवार, जितेंद्र चव्हाण, मनीष चव्हाण, कल्पेश फुलपगारे, लीलाधर खडके, रोहीत पारधी, सुवन वशिष्ट, जेसल पटेल, आमिन पिंजारी.

४) रायसोनी अचिव्हर्स

मालक -प्रीतम रायसोनी, कोच – मुश्ताक अली निसार, आयकॉन खेळाडू- सचिन चौधरी. उर्वरित खेळाडू- प्रतिक नन्नवरे, उदय सोनवणे, चंदन वाणी, आदित्य बागडदे, योगेशसिंग चौधरी, तुषार चोरडिया, कैलास पांडे, शेख मासूम शकील, रोहीत तलरेजा, चारुदत्त नन्नवरे, लतिकेश पाटील, उदयन पाटील, अश्फाक शेख, रफीक शेख, योगेश तेलंग, आदित्य बोरसे आणि निहाल शेख.

५) एम के वॉरियर्स

मालक- महेंद्र कोठारी, कोच – सचिन सोनवणे, आयकॉन खेळाडू – तनेश सुरेशचंद जैन. इतर खेळाडू- सुशांत जाधव, अनिकेत पटेल, पीयूष सोहणे, गौरव चौधरी, महेश लोहार, गोपाल मिद्य, राहूल निंभोरे, भरत शर्मा, सौरभ सिंग, राहूल चौधरी, अबुशाफे मोहमंद हनिफ खान, किरण कोळी, शुभम नेवे, इम्रान पठाण, अभिनय यादव, ऋषिकेश यादव, आशुतोष शिंदे.

६) खान्देश ब्लास्टर्स

मालक – रमेश जैन, कोच- तन्वीर अहमद जहागीरदार आयकॉन खेळाडू- धवल हेमनानी. संघातील उर्वरित खेळाडू – घनश्याम चौधरी, रुपेश राठोड, विकार शेख, मयुरेश चौधरी, निनाद चौधरी, राहूल रमेश कोळी, शीतल कोतुल, विरेन पाटील, कुनाल फालक, तौसिफ बेग, इम्रान खान, नेताम राहूल, सुधांशू शितोळे, परेश सोनवणे, प्रतिक सुकले, विशाल सोनवणे, नचिकेत ठाकूर.

७) सिल्व्हर ड्रॉप एस.के. हेल्दी मास्टर्स

मालक- धीरज अग्रवाल, कोच- अनंत वाघ,आयकॉन खेळाडू- विजय संजय लोहार. इतर खेळाडू रिषभ विलास कारवां, सूरज मायटी, शिवप्रसाद पुरोहीत, जितू घमंडे, जितेंद्र पाटील, रोहीत मनोहर पाटील, फक्रुद्दीन शेख, विशाल दिलीप शिरसाठ, हसिनखाँ तडवी, प्रतिक चतुर्वेदी, मोहीत शंकर चौधरी, दीपक ढंडोरे, विक्रांत सुरेश गैगोळे, योगेश पाटील, विशाल विश्‍वकर्मा, चेतन वानखेडे, समी मोहंमद.

८) के के कॅन्स थंडर्स

मालक – आदर्श कोठारी, कोच- प्रशांत ठाकूर, आयकॉन खेळाडू प्रद्युम्न महाजन. संघात सहभागी खेळाडू- राहूल दिनकर जाधव, रोहीत चंदूलाल पटेल, राहूल रघुवीर यावलकर, किरण यशवंत चौधरी, भूषण चित्ते, सत्यवान जाधव, मोहंमद नदीम कासिम, हितेश पटेल, अक्षय अशोक शर्मा, सतनामसिंग बावरी, जय दीपक चावरीया, चेतन फुलवाणी, दीपक कुंभार, आशुतोष पाटील, महेश पाटील, राजेश पेंडले, अमेय कोळी.

जळगाव क्रिकेट लीगमधील सर्व संघमालक.

Add Comment

Protected Content