कोरोना थांबेना : आज ९८६ बाधीत; जळगावात ३५० पॉझिटीव्ह !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायम असून आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९८६ रूग्ण आढळून आले आहेत. तर यातील ३५० पेशंट हे जळगावातील असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- ३५०, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-८९, अमळनेर-२, चोपडा-१४१, पाचोरा-४६, भडगाव-२, धरणगाव-३४, यावल-३२, एरंडोल-७९, जामनेर-६७, रावेर-२४, पारोळा-३३, चाळीसगाव-९, मुक्ताईनगर-१८, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ९८६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात एकुण ६९ हजार ६४८ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ६० हजार ९३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७ हजार २७५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज देखील ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण १ हजार ४३८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ एन.एस. चव्हाण यांनी कळविले आहे. 

Protected Content