बीएचआर घोटाळा खटला : पहिल्या दिवशी तीन ठेविदारांची साक्ष

जळगाव प्रतिनिधी । Bhr Scam बीएचआर सहकारी पतसंस्थेच्या खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ झाला असून याच्या पहिल्या दिवशी तीन ठेविदारांची साक्ष घेण्यात आली आहे.

बीएचआर सहकारी पतसंस्थेच्या Bhr Scam मूळ घोटाळ्याची सुनावणी आता जळगाव जिल्हा न्यायालयात सुरू झाली आहे. या गैरव्यवहार प्रकरणात पतसंस्थेचा संस्थापक संचालक प्रमोद रायसोनी याच्यासह सर्व १४ संचालकांविरुद्ध, राज्यभरात ८१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यांची जळगाव न्यायालयात एकत्रीत सुनावणी घेण्यात यावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या अनुषंगाने यातील पहिल्या खटल्यास जिल्हा न्यायालयात न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात सुनावणीस सुरुवात झाली.

पहिला खटला हा पाचोरा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा आहे. यात पहिल्याच दिवशी युवराज पाटील, विष्णू पाटील, महेंद्र शहा या तीन जणांची साक्ष न्यायालयाने नोंदवली. यातील युवराज पाटील यांची दोन लाख ८८ हजार, विष्णू पाटील यांची दोन लाख ४ हजार तर शहा यांची १ लाख ५८ हजार रुपयांची ठेव Bhr Scam बीएचआरच्या पाचोरा शाखेत आहे. त्यांना देखील मुदतीत ठेव परत मिळालेली नाही. या प्रकरणात विजयसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. शनिवारी न्यायाधीश हिवसे यांच्या न्यायालयात तिघांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी होणार आहे. तर १७ एप्रिल ते ३ मे दरम्यान, दररोज सुनावणी घेण्यात येईल.

Protected Content