जळगावात महिलेसह मुलांना नातेवाईकांकडून बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । जुन्या घटनेचा राग मनात ठेवून नातेवाईकांनी भिलपूरा येथील कुटुंबातील महिलेसह दोघा मुलांना मारहाण केल्याची घटना घडली. यात एक जखमी झाला. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,  शेख सलीम शेख अहमद  वय ४८ हे शनिपेठेत भिलपुरा मशीदीच्या मागे कुटुंबासह वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी शेख यांचा २ महिन्यांचा नातूचा नाका तोंडातून उलटी होवून श्‍वास कोंडून मृत्यू झाला आहे. त्याचा राग मनात ठेवून शेख सलीम यांचे नातेवाईक शेख अक्तर शेख अहमद, शेख अकबर शेख नबी, रुकय्याबी शेख अबकर, शेख अक्रम शेख अकबर सर्व रा. पाळधी ता. धरणगाव हे १४ मे रोजी जळगाव शहरातील भिलपुरा येथे शेख सलीम यांच्याकडे आले व शेख सलीम यांची पत्नी सुलतानाबी, मुलगी नुर बानो, मुलगा अल्तमश यांना शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. शेख अक्रम याने केलेल्या मारहाणीत अल्तमश हा जखमी झाला आहे. या मारहाणीदरम्यान शेख सलीम यांच्य पत्नीचेही मंगळसूत्रही तोडून नुकसान झाले. याप्रकरणी आज रविवारी शेख सलीम शेख अहमद यांच्या फिर्यादीवरुन शेख अक्तर शेख अहमद, शेख अकबर शेख नबी, रुकय्याबी शेख अबकर, शेख अक्रम शेख अकबर सर्व रा. पाळधी ता. धरणगाव यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज इंद्रेकर हे करीत आहेत.

Protected Content