जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात काहीही कारण नसतांना एकाने तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून तोंडावर फायटर मारून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
शंकर विश्वनाथ साबळे (वय-१९) रा. गेंदालाल मिल असे जखमी तरूणाचे नाव आहे. शंकर साबळे हा तरूण गेंदालाल मिल परिसरातील अक्षय किराणा दुकानाजवळील दिल्ली गेट जवळ १४ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उभा होता. त्याच वेळी रईस लाला (पुर्ण नाव माहित नाही) रा. लक्ष्मी नगर, गेंदालाल मिल याने काहीही कारण नसतांना शंकरच्या डोक्यात बिअरची बाटली मारली तर फायटरने तोंडावर मारून शिवीगाळ केली. खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर शंकर साबळे यांच्या फिर्यादीवरून रईस लाला याच्याविरूध्द शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पाटील करीत आहे.